“मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार व शिष्यवृत्ती वाटप समारंभ संपन्न”
नागपूर | दरवर्षीप्रमाणे मराठा समाजातील गुणवंताचा सत्कार व गरीब- होतकरू गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप समारंभ मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर तर्फे रविवार दि. 24.8.2025 ला सकाळी 11 ते 3.00 यावेळेत संस्थेच्या सक्करदरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृहात श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोंसले यांचे अध्यक्षतेत, प्रसिद्ध उद्योगपती- माजी कार्याध्यक्ष श्री जयंतराव खळतकर, सौ. सिमाताई सुर्वे (पोलीस निरीक्षक भरोसा सेल/ दामिनी पथक, नागपूर शहर) यांच्या प्रमुख उपस्थितित सम्पन्न झाला. याप्रसंगी समाजातील २५० चे वर गरीब होतकरू व गरजू विद्यार्थांना शिष्यवृत्ती रक्कमेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मुख्य सचिव डॉ. प्रकाश मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे मुख्य संयोजक श्री नरेन्द्र मोहिते यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार सदस्या सौ. ममताताई भोसले यांनी मानले.नुकतेच वडिलांचे अकस्मात निधन झाल्यावरही न खचता- न डगमगता CBSC वर्ग 10 वी च्या परीक्षेत 100% गुण प्राप्त करून National Topper ठरलेल्या मराठा समाभूषण कु. शांकरी किशोराराव जाधव या विद्यार्थिनीला मान्यवरांचे हस्ते शॉल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या* यश दत्ताजी कदम, सुरेश पंजाबराव घोरपडे, अनुष्का प्रवीण मते, नित्यश्री विक्रम पठाडे, प्रियांशू गजेंद्र जाचक, अनुप नरेंद्र घोगले, आदिती किशोर पौळ, अमिषा महेश जाधव, हर्षिता मंगेश काळे, भक्ती सुनील जाचक, संचिता प्रदीप चोरमारे, रुचिका सुनील भोसले इत्यादी विद्यार्थांना पाहुण्यांचे हस्ते स्मृतिचिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले.


मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 10% मिळालेल्या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी जुलै महिन्यात मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे घेण्यात आलेल्या मराठा जात प्रमाणपत्र शिबिरात SEBC प्रमाणपत्र काढलेल्या 65 लोकांना मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.नागपूर संस्थापक पहिले रघुजी महाराजांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रातील जनतेच्या दर्शनाकरीता आणण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्रीमंत राजे डॉ. मुधोजी महाराज भोंसले यांचा शिष्यवृत्ती वाटप समितीच्या वतीने भगवी शॉल व पुष्पहाराने विशेष गौरव करण्यात आला.या शिष्यवृत्ती वाटप समारंभासाठी *यावेळी श्रीमती रेणुकाताई किशोरराव जाधव व श्री दिपक भोसले यांचे तर्फे नवीन मुदत ठेवीच्या स्वरूपात 1,51,101/- रुपयाची आर्थिक मदत संस्थेकडे प्राप्त झाली.
तसेचश्रीमंत राजे डॉ. मुधोजी भोंसले, श्री दिलीप चव्हाण, डॉ. प्रकाश मोहिते, श्री. सुरेश काळे, श्री. शंकरराव जाधव,श्री.देवेंद्रजी शिंदे, श्री गजानन कावळे, श्री सुशांत शिवाजीराव शिंदे, श्री राजेश जाधव, श्रीमती मालतीबाई मधुसूदन मोहिते, श्री मनोहरराव कबले, सौ. कविता जयंतराव भोसले, श्री अनुप जाधव, श्री अविनाश घोगले, श्री प्रविण माने, श्रीमती सिमाताई शरदराव भोसले, श्री विजयराव घोरपडे, श्री राजेंद्र मुकुलवार, श्रीमती विनिताताई सतीशराव गिरमकर, श्री हरीश इंगळे, श्री प्रशांत (बालू) भोसले, श्री ललित (छोटू) पवार, श्री विजय भोसले इत्यादी समाजबांधवानी नगदी रक्कम देऊन शिष्यवृत्ती साठी आर्थिक सहकार्य केले तर पुढील कार्यक्रमात 21000 रुपये नगदी स्वरूपात देण्याची घोषणा श्री जयंतराव खळतकर यांनी केली.
आज विद्यार्थ्यांनी स्वयं सुरक्षसाठी जागृत असावे, चांगले व वाईट मित्र कोण हे मुलींनी ओळखावे, पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष दयावे अशा अनमोल सूचना यावेळी पोलीस निरीक्षक सिमाताई सुर्वे यांनी केल्या.
यावेळी वर्ग 10 वी बोर्डाचे परीक्षेत 90% व वर्ग 12 वी चे बोर्डाचे परीक्षेत 80 % गुण प्राप्त करणाऱ्या तसेच वर्ग 5 वी ते 9 व 11 मध्ये जास्तीत जास्त गुण प्राप्त केलेल्या प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांना सुद्धा यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला समाजातील शेकडो मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री प्रविण शिर्के, दिलीप सस्ते, निलेश चव्हाण, प्रशांत (बालू ) भोसले, अनुप जाधव, सतीश मोहिते, सौ. अनिताताई जाधव, महेंद्र शिंदे, अविनाश घोगले, हरीश इंगळे, गजानन कावळे, अमर पिसाळ, ललित पवार प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सर्वांच्या सकारात्मक सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद..आपलाच नरेन्द्र मधुसूदन मोहिते शिष्यवृत्ती वाटप आयोजन समिती प्रमुख