पुणे-सोलापूर रस्ता हडपसर ते पाटस या पट्ट्यात वेगाने होतोय
पुणे । पुणे सोलापूर रस्ता हडपसर ते पाटस या पट्ट्यात वेगाने नागरीकरण होत आहे.नियोजित विमानतळ झालेच तर कोणकोणत्या संधी निर्माण होणार आहेत याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.
सध्या या पट्ट्यात मिसळ व चहा फ्रँचायझी,नॉन व्हेज हॉटेल्स,नर्सरी, गूळ उत्पादन, जेसीबी ट्रॅक्टर भाड्याने देणे,जमिनीचे प्लॉटिंग,गोडावून आदी व्यवसाय प्रामुख्याने दिसतात. भविष्यकाळात आणखी कोणकोणत्या संधी सर्व्हिस सेक्टर व उद्योग व्यवसायात निर्माण होऊ शकतात. यासाठी गट चर्चा करून वित्तीय सहकार्य मिळविणे, उद्योजकीय मार्गदर्शन घेणे यासाठी संघटना नियमित उपक्रम राबवित असते त्यात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
लोकमंगल बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री सुभाषबापू देशमुख अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोंढरे संयुक्त सरचिटणीस गुलाबदादा गायकवाड विविध क्षेत्रातील उदयोजक उपस्थित होते.या कार्यक्रमात नवीन उद्योजकांना बँकेतर्फे कर्ज वितरण करण्यात आले व पर्यटन व्यवसाय आणि महामंडळ यांच्या वतीने माहिती दिली गेली. अखिल भारतीय मराठा महासंघ हवेली तालुका, राज्य मराठी पत्रकार परिषद व लोकमंगल सह बँक हडपसर विद्यमाने उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे संयोजन सर्वश्री सचिन सुंबे गजानन जगताप सचिन माथेफोड अनिरुद्ध मराठे चंद्रकांत दुंडे भाऊ जाधव दीपक गोते सुभाष कड प्रभाकर धुमाळ निलेश सुंबे यांनी केले. याप्रसंगी दादा भोंडवे अमर पवार सौ नंदिनी मुरकुटे सविता कांचन सुरेखा कांचन संगीता काळभोर लता हरगुडे स्वाती चौधरी उपस्थित होत्या.