रात्रीची गौण खनिज भरारी पथकासाठी शासकीय वाहन मिळणे यासाठी पोलीस पाटील संघटनेतर्फे निवेदन
शिंदखेडा तालुक्यात तहसीलदार यांच्या आदेशान्वये रात्रीच्या गौणखनिज पथकात पोलीस पाटलांना ड्युटी लावण्यात आली असून पोलीस पाटील आपले कर्तव्य इनामदारने महसूल विभागाला खांद्याला खांदा लावून बजावत आहे मात्र नुकतेच रेवाडी येथील पोलीस पाटील आप्पा जगन ढिवरे यांच्यावर रेती माफियाचा जिवघेणा प्राण घातक हल्ला झाला
मात्र पोलीस पाटलांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही व कोणत्याही प्रकारचे शस्त्र परवाना नाही आशा कोणत्याही प्रकारच्या शासनाचा आदेश नाही की पोलीस पाटील यांना गाव सोडून गस्त भरारी पथकात पाठवावे दिवसेंदिवस रेतिमाफीयाचा पोलीस पाटील यांच्यावर हल्ल्यांच्या प्रकारात वाढ झाली आहे यासाठी रात्रीच्या गस्तीसाठी शासकीय वाहन उपलब्ध करून द्यावे जेणेकरून भटके कुत्रे बिबट्या रात्रीच्या गस्तीसाठी दुचाकीवरून जात असताना यांच्या त्रास होणार नाही यासाठी तहसीलदार यांनी लक्ष
घालून शासकीय वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे