गणेशोत्सवासाठी पूजा सामग्री संच आणि आरती संग्रह ; शिवसेनेची संकल्पनेचे उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण
मुंबई | शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे गणेशोत्सवानिमित्त स्थानिकांसाठी पुजा सामग्री संच व आरती संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते मातोश्री येथे करण्यात आले.
यावेळी शिवसेना सचिव खासदार श्री अनिल देसाई, शिवसेना नेते श्री विनायक राऊत, खासदार श्री अरविंद सावंत, आमदार श्री अनिल परब, विधानसभाप्रमुख अशोक म्हामुणकर, समन्वयक श्री राजू मुल्ला, माजी नगरसेवक योगेश भोईर व सौ माधुरी भोईर, उपविधानसभा समन्वयक तुकाराम पालव, उपविधानसभा समन्वयक सौ सारिका झोरे, शाखासंघटक सौ माधुरी खानविलकर, शाखा समन्वयक सौ इतिश्री महाडिक. ही संकल्पना मागाठाणे विधानसभा निरीक्षक, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांची आहे.