एरंडोल येथील वरखेडे येथे विजेचा धक्का लागल्याने एकाच परिवारातील पाच जणांचा मृत्यू
जळगावमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जळगावमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
जळगावमधील एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात अख्ख्या कुटुंबाचा शेवट झाल्याची धक्कादायक घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये आई, मुलगा, सून आणि दोन लगान मुलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अख्ख्या कुटुंबाचा शॉक लागून मृत्यू झाला की घातपात होता? याची चर्चा जळगाव आणि एरंडोलमध्ये सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे, त्यामध्ये विजेच्या शॉक लागण्याची घटना घडलेली असू शकते असे दबक्या आवाजात बोलले जाते.


एरंडोल येथील वरखेडी शिवारज राहाणारे अख्खं कुटुंब विजेच्या शॉक लागून संपलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेतामध्ये असणाऱ्या पत्र्याच्या शेडच्या घरात हे कुटुंब राहात होते. पोलिसांनी तात्काळ पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी ही दुर्घटना आहे की आत्महत्या, हत्या याचा तपास घेतला जात आहे.