15 ऑगस्ट रोजी जळगाव शहरात मांस विक्रीला बंदी
जळगाव शहरात स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत.
आदेशात स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख न करता याच दिवशी श्रीकृष्ण जयंती असल्याने मांस विक्रीवर बंदी बाबत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आणि 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी या दिवशी दोन मांसविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या बंदी असलेल्या दिवशी व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षात प्रथमच स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंद राहणार असल्याने हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे

