दादर रेल्वेस्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतरासह इतर मागण्यांसाठी लाँग मार्च
इगतपुरी ।
अखिल भारतीय आदिवासी सेनेचे तत्कालीन व विद्यमान राज्य व केंद्र सरकारकडे दादर रेल्वे स्थानकाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतरासह इतर प्रमुख मागण्यासाठी अनेकदा आंदोलन व निवेदन देऊनही जाणीवपुर्वक प्रलंबीत आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्यात आले मात्र केवळ देशाची घटना बहाल करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे शासनाला काय वावडे आहे. नामांतर करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांच्या बाबतीत एकही आंदोलन किंवा जनतेची मागणी नसतांना ही नामांतर केले गेले. मग दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर का होत नाही हा प्रश्न सर्व पुरोगामी समाजाला पडला आहे.
सर्वधर्म व संघटना समतेची भावना असणारे देशातील जन समुदाय चैत्य भुमीवर येवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर वंदन करतात. तरीही महामानवाच्या नावाचा द्वेष का ? असा सवाल अखिल भारतीय आदिवासी सेना संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांनी उपस्थित करीत राज्य व केंद्र शासनाच्या द्वेष भावनेचा निषेध केला. येत्या १६ ऑगष्ट रोजी चैत्यभुमी ते राज भवन, मंत्रालय, भाजपा, राकॉपा, शिवसेना पक्ष कार्यालयावर संविधान बचाव जन जागृती अभियान, जनआक्रोश मोर्चाद्वारे संबधित अधिकारी व मंत्री यांना निवेदन देणार असल्याचे उघाडे यांनी सांगितले.


यावेळी आखिल भारतीय आदिवासी सेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत दि. ना. उघाडे बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी सेनाचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे, ठाणे जिल्हा प्रमुख राजाभाऊ ठाकरे, मनिषा बांगारे, पांडुरंग वारघडे, मुरलीधर गांगड, भारती वीर, चांगुणा मेंडोळ, कुसुम डोखे, लीला येरे, अमिता फोडसे, नंदलाल रेरे, सुमन रेरे, भाऊ शिद, अनु सया हिंदोळे, दवल भले, बुधा पावसे, सुमन हिंदोळे, बुधा ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.