एरंडोल तालुक्यात एसटीला भीषण अपघात; बस थेट खोल चारीत पडली

0

एरंडोल । एरंडोल भडगाव महामार्गावर राज्य महामंडळाच्या एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली. ज्यात प्रवाशांनी भरलेली बस थेट पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या चारीत जाऊन पडली. यात जवळपास 35 ते 40 प्रवासी हे जखमी झाले असून एक प्रवासी प्रवाशी जागेवरच ठार झाल्याची माहिती समोर आलीय.

याबाबत असे की, एरंडोल बस आगाराची बस क्रमांक MH 20 BL 4302 या क्रमांकाची गाडी भडगाव कडून एरंडोल कडे येत असताना एरंडोल पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अंजनी धरणालगत असलेल्या पंधरा ते वीस फूट खोल असलेल्या चारीत जाऊन पडली.

सदर बस ही खोल नाल्यात पडल्याने प्रवाशांना मागच्या व पुढच्या काचेतून तसेच खिडकीच्या बाहेर काढण्यात आले. यावेळी एरंडोल येवला राज्य मार्ग काही काळ थांबवण्यात आला होता. या अपघातात 35 ते 40 प्रवासी हे जखमी झाले असून एक प्रवाशी जागेवरच ठार झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातातील गंभीर जखमी रुग्णांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तर काही गंभीर जखमी हे जळगाव रवाना करण्यात आले असून बाकी रुग्णांवर एरंडोल येथे उच्चार सुरू आहेत.

यावेळी अमित पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, संजय महाजन यांनी घटनास्थळी धावत जखमींना मदत कार्य केले तसेच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदत कार्य केले. घटनेची वार्ता गावात पसरतात ग्रामीण रुग्णालय येथे जखमींच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली तर आरोग्य अधिकारी कैलास पाटील व मुकेश चौधरी यांनी जखमींवर तात्काळ उपचार सुरू करून इतर ॲम्बुलन्स बोलवून बाकी जखमी यांना जळगाव येथे तर काही जखमी यांना खाजगी रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.