देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल
मुंबई । देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला आहे. विशेष यात विधिमंडळात रम्मी खेळणं आणि शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीमंत्रिपद काढून घेतले. त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रालयाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
कोकाटे यांच्यावर विधानसभा अधिवेशनात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीका झाली होती. यामुळे त्यांच्याकडील कृषी खाते काढण्यात आल्याची चर्चा आहे. ३१ जुलै रोजी रात्री राज्य सराकरकडून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय महायुती सरकारमधील कामगिरी आणि पारदर्शकतेच्या निकषांवर घेतल्याचे सांगितले. कोकाटे यांनी रम्मीऐवजी सॉलिटेअर खेळत असल्याचा दावा केला होता, परंतु विरोधकांनी त्यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केला. नवे कृषिमंत्री म्हणून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा खात्याची जाबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा होती, परंतु केवळ कोकाटे यांच्याच खात्यात बदल करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औेकाफ हे खाते श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांवरही टीका झाली होती, विरोधकांकडून पाच मंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. यामध्ये योगेश कदम, संजय शिरसाट, संजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. पण त्यांच्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.