जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

0

उत्पन्न, EBITDA आणि नफ्यात उल्लेखनीय वाढ; मायक्रो इरिगेशन, टिश्यूकल्चर, सौर कृषी पंप विभागात मागणी वा ढ

जळगाव | जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीचे एकत्रित (Consolidated) आणि स्वतंत्र (Standalone) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनी मायक्रो इरिगेशन, पीव्हीसी व एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, अ‍ॅग्रो प्रॉसेसिंग, सोलर कृषी पंप, टिश्यूकल्चर रोपे, नूतनीकरणीय ऊर्जा आणि कृषी सेवा क्षेत्रात कार्यरत आहे.

ठळक आर्थिक बाबी :

एकत्रित उत्पन्न : ₹१,५४६ कोटी, ४.६% वाढ
स्वतंत्र उत्पन्न : ७.३% वाढ
एकत्रित EBITDA : ₹२०२ कोटी, १३% वाढ
स्वतंत्र EBITDA : ₹१२३ कोटी, १५.५% वाढ
EBITDA मार्जिन : १३.१% (९८ बेसिस पॉईंट्स सुधारणा)

 

कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले, “मायक्रो इरिगेशन, टिश्यूकल्चर आणि सौर कृषी पंप क्षेत्रात मागणी वाढली आहे. हायटेक अ‍ॅग्रो डिव्हिजनमध्ये महसूल आणि नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. निर्यात व्यवसायातही समाधानकारक प्रगती दिसून येत आहे.” त्याचप्रमाणे तेही म्हणाले की,“आम्ही कामगिरी, नवोन्मेष, वित्तीय शिस्त यांचा समतोल राखत आहोत. सर्व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती हे आमचे ध्येय आहे.”

आव्हाने आणि संधी :

मे महिन्यातील लवकर पावसामुळे पाईप व्यवसायावर परिणाम.
महाराष्ट्रातील जल जीवन मिशनच्या मंद गतीमुळे पाईप विभागावर दबाव.
कच्च्या तेलाच्या स्थिर किंमतींमुळे कच्च्या मालाचा खर्च नियंत्रणात.
आंबा हंगाम चांगला असूनही बाजारभाव कमी राहिल्याने महसूलात फारशी वाढ नाही.

वित्तीय दृष्टिकोन :

तिमाहीतील भांडवल गुंतवणूक कार्यकारी गरजांवर केंद्रित.

इन्व्हेंटरी आणि थकबाकीत थोडी वाढ, परंतु पुढील तिमाहीत सुधारणा अपेक्षित.

कंपनीचे लक्ष रिटेल आणि निर्यातीवर, ज्यामुळे महसूल आणि नफा वाढण्याची शक्यता.

Leave A Reply

Your email address will not be published.