आनंदाची बातमी ! आज सोने आणि चांदी भाव घसरला, जाणून घ्या नवीन दर
मुंबई । गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या सोने आणि चांदी दरात आज मोठी घसरण झाल्याचं दिसून येतेय. यामुळे सोनं आणि चांदीची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आज सुवर्णसंधी आहे.
आज बुधवारी सराफा बाजार उघडताच २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १३० रूपयांनी घसरलेय. प्रति १० तोळं सोनं एक हजार रूपयांपेक्षा जास्त स्वस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या किंमतीमुळे सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे समजतेय.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे सोन्याचे दर काही शहरांमध्ये स्थिर, तर काही ठिकाणी थोडे वाढलेले दिसत आहेत. आज सराफा बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 99,760 रुपये इतका झाला. मंगळवारी हा भाव 99,890 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,440 रुपये, तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 74,820 रुपये आहे. चांदीचा भाव प्रति किलो 1,14,900 रुपये आहे.
सोन्याचे दर कसे ठरवले जातात ?
सोने आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतींवर आधारित असतात. भारतात IBJA आणि स्थानिक सराफा बाजार यांच्या आधारावर दर जाहीर केले जातात. सोने आणि चांदीच्या किंमती दररोज बदलतात आणि त्या ठरविण्यासाठी अनेक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. या किंमतींवर आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम होतो. जागतिक बाजारात अनिश्चितता वाढते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारापासून दूर राहून सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांचा आधार घेतात, त्यावेळी सोन्याच्या दरात वाढ झालेली दिसून येते. डॉलरचे मूल्य कमी झाले, तर सोन्याचे दर वाढतात. रुपया कमकुवत झाला, तर सोन्याचे दर वाढतात.