जळगावात सोशल मीडियातील ओळखीतून तरुणीवर अत्याचार
जळगाव | जळगाव सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून नेरीच्या (ता. जामनेर) तरुणाने धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या १८ वर्षीय तरुणीला जळगावात बोलावत अत्याचार केल्याची घटना समोर आलीय याबाबत शनिवारी रामानंद नगर पोलिसात अमोल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता तिची मोठी बहिण व आईसोबत शिरपुरला राहते. दहावीनंतर सोशल मीडियावर तिची अमोलशी ओळख झाली. दोन वर्षापासून ते संपर्कात होते. अमोलने बुधवारी (९ जुलै) दुपारी ३ वाजता तिला फोन करून जळगावला बोलावले. तिला घेण्यासाठी अमोल हा मित्र राजु राठोडसह बस स्टॅण्डवर आला होता. त्यानंतर ते शिवकॉलनीतील राजुच्या घरी गेले.
थोड्या वेळाने राजु व त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले. त्यावेळी अमोलने जबरदस्ती केली असता पीडितेने त्याला नकार दिला. नंतर रात्री साडेआठ वाजता अमोलने जवळच एक रुम भाड्याने घेत तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर राजुच्या घरी नेऊन सोडले. पीडितेने राजु व त्याच्या पत्नीला घडलेला प्रकार सांगितला.