आदिवासी भागातील माध्यमिक शाळेत गुरुपौर्णिमा साजरी ; 10वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभही संपन्न

0

ठाणे |  10 जुलै, गुरुवार रोजी माध्यमिक विद्यालय, अंदाड, या. शहापूर येथे गुरुपौर्णिमा आणि इ. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहोळा असा दुग्धशर्करा योग जुळून आला. याप्रसंगी दि. एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ चे उपाध्यक्ष श्री. अशोक कुलकर्णी व सदस्य श्री. दिपक चव्हाण हे उपस्थित हॊते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. अशोक कुलकर्णी व प्रमुख पाहुणे म्हणुन श्री. दिपक चव्हाण यांनी स्विकारले श्री. कुलकर्णी सर आणि मा श्री. चव्हाण सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपिका विशे यांनी केले. श्री. देव यांनी सूत्रसंचालन केले. इ. 8 वी च्या मुलींनी ईशस्तवन स्वागतगीत आणि 9 वी च्या मुलींनी देशभक्ती गीत सादर केले.

इ. 10 वी तून प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे श्री. कुलकर्णी, श्री. चव्हाण, सौ. दीपिका विशे यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. ह्या देणगीतून प्रेरणा घेऊन हीच मुले आता क्लास टू ऑफिसर झाली आहेत यासाठी दि एज्यु सोसायटी अंबरनाथ व सर्व देणगीदार यांचे मनःपूर्वक धन्यवाद!!!

याप्रसंगी दि एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री गोडबोले यांनी शाळेतून गरीब हुशार व होतकरू मुलीसाठी रुपये 5000 हजारचे बक्षीस मा उपाध्यक्ष श्री कुळकर्णी यांच्या शुभहस्ते विद्या बांगारे या मुलीला प्रदान करण्यात आले एकूण 15921 रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. सूर्यवंशी सर यांनी केले. याप्रसंगी श्री.खाकर, श्री. भाकरे भाऊसाहेब उपस्थित हॊते. शेवटी आभार प्रदर्शन श्री. महाले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.