बियर न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

0

जळगाव । यावल तालुक्यातील चिंचोली फाट्यावर असलेल्या हॉटेलवर दुचाकीने आलेल्या दोघांनी बियर न दिल्याने हॉटेल मालकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. यात हॉटेल मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगावातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर काल रात्री ९:३० च्या सुमारास आपले हॉटेल बंद करून जळगावला जाण्यासाठी कारमध्ये बसले. त्याचवेळी दोन जण त्यांच्याजवळ आले आणि हॉटेल सुरु करून दारू देण्याची मागणी केली. बाविस्कर यांनी हॉटेल बंद केले सांगितले असता संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी बंदूक काढून थेट बावीस्करांवर रोखली. आणि त्यांच्या दिशेने गोळीबार केला.

या गोळीबारात बावीस्करांच्या मानेला गोळी लागल्याने ते जागीच कोसळले. घटनेनंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. बावीस्करांच्या मुलाने आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह घटनास्थळावर पोहचले आणि त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. हल्लेखोर अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.