आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या भरधाव कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

0

अहिल्यानगर : बीडमधील आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर- पुणे महामार्गावर घडली. ही गाडी आमदार सुरेश धस यांचा मुलगाच चालवत होता की, अजून कोणी याबद्दल माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, सागर धसच गाडी चालवत असल्याची एक चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश शेळके असं अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धस यांनी त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या दुर्घेटनेबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर धस हे रात्री आष्टीवरून पुण्याच्या दिशेला निघाले होते. सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला. रस्त्याने जात असताना सागर धस यांच्या गाडीने शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जात आहे. या धडकेनंतर दुचाकीचे आणि सागर धस यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर नितीन शेळके यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ही गाडी आमदार सुरेश धस यांचा मुलगाच चालवत होता की, अजून कोणी याबद्दल माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, सागर धसच गाडी चालवत असल्याची एक चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.