वारीहून परतताना एसटी बसला अपघात; विठुराया आला मदतीला धावून, सर्व भाविक सुखरुप

0

बुलढाणा । विठुमाऊलीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला भीषण अपघात झाला. पंढरपूर येथून निघालेली एसटी बस बुलढाण्यातील खामगावच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 53 भाविक होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस चिखली शहराजवळ पोहोचली तेव्हा बसला अपघात झाला. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडरला धडकली. त्यानंतर बस उलटली.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली आणि सर्व भाविकांना बसमधून बाहेर काढले. या अपघातात काही भाविकांना किरकोळ दुखापत झाली आहे. विठुरायाच्या कृपेने मोठा अपघात टळला आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी भाविकांची प्रकृती स्थिर आहे.

या एसटी बसमध्ये एकूण 51 भाविक आणि चालक तसेच वाहक असे एकूण 53 जण होते. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये भाऊसाहेब शोनाजी थांडे (वय 45, रा. तळेगाव), पुष्पा विनोद शिंगणे (वय 39, रा. तेल्हारा). प्रदीप रघुनाथ धर्मसकर (वय 48, रा. दहीगाव). विठ्ठल तुलसीराम पांडे (वय 37, रा. तळेगाव), रामप्रसाद हरिभाऊ पांडे (वय 60, रा. तळेगाव), सुरेश दिगंबरराव फोकमारे (वय 60, रा. सवदंरा), शोभा झोरे (वय 60, रा. जानोरी रोड), गोविंद वासुदेव पांडे (वय 60, रा. वडेगाव), तुकाराम पांडुरंग कोकरे (वय 69, रा. बाळापूर), ईश्वर हरिचंद्र मोरे (वय 65, रा. जवळा), रुख्मीना वसंत इंगळे (वय 62, रा. बाळापूर), सुजाता राहुल वानखेडे (वय 30, रा. चिखली), शिवाजी सुभाष जाधव (वय 32, रा. अन्वा), नर्मदा अवचित मोरे (वय ४५, रा. मिराळवाडी, चिखली), आकाश अशोक डोके (वय 45, रा. मंगरुळ-नवघरे) यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.