भाषिक भेदभावाची भूमिका संविधानविरोधी असून परप्रांतीयांवर दादागिरी करणे योग्य नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई | मराठी आणि हिंदी असा भाषिक भेदभाव होता कामा नये.मुंबई महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी उद्योगधंद्यासाठी आलेल्या परप्रांतीयांना मराठी भाषा बोलता येत नाही म्हणुन त्यांच्यावार जबरदस्ती करणे ;दादागिरी करुन मारहाण करणे योग्य नाही. मराठी भाषेवर आमचे प्रेम आहे.मराठी हि आमची मातृभाषा आहे,तर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे.मराठी हिंदी असा भेदभाव नको.हिंदीचा द्वेष नको. हिंदी भाषेचा द्वेष करुन परप्रांतीयांना मारहाण करने हा राष्ट्रभाषे विरुध्द राष्ट्रद्रोह आहे. भाषिक भेदभाव संविधानविरोधी आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.बांद्रा येथील कार्यालयात ना.रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे देशात कोणत्याही राज्यात जावून राहण्याचा उदरनिर्वाहासाठी उद्योग किंवा नोकरी करण्याचा अधिकार सर्व भारतीयांना दिला आहे. परप्रांतीय व्यापारी उद्योजकांवर अशी मारहाण होत राहिली तर मुंबईतील उद्योग बाहेर निघुन जातील देशाची आर्थिक राजधानी म्हणुन मुंबईच्या प्रतिमेला धक्का बसेल. राज आणि उध्दव यां ठाकरे बंधूंनी घेतलेला विजय मेळावा खरेतर आम्हीच घेतला पाहिजे होता.हिंदी सक्तीचा नियमाचे दोन्ही जी आर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी रद्द करुन राज उध्दव यांच्या विजयी मेळाव्याची आधीच हवा काढली आहे. असे ना. रामदास आठवले म्हणाले.
मराठी भाषेच्या आग्रहामागील भावनांचा विचार करुन परप्रांतीयांनी संयम बाळगावा.मराठीच्या मुद्दयांवर परप्रांतीयांनी आव्हानात्मक भाषा वापरु नये. मराठीच्या मुद्दयावर राज आणि उध्दव एकत्र आले असले तरी महायुतीला काही फरक पडणार नाही. उलटपक्षी
महाविकास आघाडीत फुट पडेल.राज उध्दवला मुंबई महापालिका जिकंता येणार नाही असा दावा ना. रामदास आठवले यांनी केला.