आषाढी एकादशीचा उत्सव अनुभूती बालनिकेतन व विद्यानिकेतनमध्ये भक्तिभावाने साजरा

0

जळगाव | अनुभूती बालनिकेतन व अनुभूती विद्यानिकेतन स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. हा उत्सव भक्ती, संस्कृती आणि एकतेचे सुंदर दर्शन घडवणारा ठरला. संपूर्ण शाळा विठ्ठलमय वातावरणात न्हालेली दिसून आली.

विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल व देवी रुक्मिणी यांच्या वेशात उपस्थित राहून वातावरण भक्तिपर केले. या प्रसंगी चिमुकल्यांनी पारंपरिक दिंडी काढली. ज्यात विद्यार्थ्यांनी वारी स्वरूपात टाळ- मृदंगासह भजन करत पालखीसोबत चालत पंढरीच्या वारीची अनुभूती करून दिली. वारीनंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची पूजा विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या हस्ते विधिपूर्वक करण्यात आली. यानंतर विद्यार्थिनी अरना अमय कोटकर हिने श्री विठ्ठलावर आधारित सुंदर भक्तिगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

आषाढी एकादशीचे महत्त्व इंग्रजी भाषेत केश्वी अग्रवाल हिने स्पष्टपणे सांगितले, तर कृषा अग्रवाल हिने मराठीतून आषाढी एकादशीचे महत्त्व आणि श्री विठ्ठल भक्तीचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. त्यानंतर अनुभूती बाल निकेतनच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले, तर अनुभूती विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी देखील सुंदर सांस्कृतिक नृत्यप्रस्तुती केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना प्रसादरूपाने गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.