भाविकांना विठ्ठलाची वारी घडवून आणणारा भडण्याचा पांडुरंग
संकटांना सामोरे जाऊन चाळीस वर्षांपासुन अखंड वारी
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माजी सरपंच व वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष माजी वि का स सोसायटीचे चेअरमन तसेच दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमन असे अनेक राजकीय पटलावर विविध पदे भूषवित धार्मिक कार्यात नियमित्त अग्रेसर असणारे भडणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील ह भ प पांडुरंग पुना माळी काही वर्षांपूर्वी एका लग्न समारंभ आटोपून पती-पत्नी घरी येत असताना धुळे महामार्गावरील एका जीवघेणा अपघातातून वाचून धुळे येथील नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये तीन- महिने आयुशुशू पती व पत्नी मध्ये ॲडमिट असताना मृत्यूच्या दाढेतून पंढरीच्या विठ्ठलावर असलेली अपार श्रद्धा विठ्ठलाची मनापासून केलेली भक्ती यामुळेच या जीवघेणा अपघातातून दोघं वाचलो त्या दिवसापासून उर्वरित बोनस आयुष्य धार्मिक कार्यात झोकुन दिले आहे परिसरात नव्हे तर तालुक्यात भागवत कीर्तन सप्ताह तसेच परीसरात धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात आतापर्यंत त्यांनी गावातील शंभर पेक्षा जास्त भाविकांना चारधाम यात्रा घडवून आणली असून दरवर्षी 40 वर्षापासून ते भडणे येथुन पंढरपूर नियमित वारी चालू असुन दरवर्षी गावातील प्रत्येक समाजातील गोरगरीब महिला पुरुष ज्येष्ठ वारकरी तसेच असे 50 हून जास्त भाविकांना दरवर्षी भडणे येथुन पंढरपूर येथे वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घडवून आणण्यासाठी ते नेहमी गावातील लोकांना आपल्या सोबत घेऊन जातात चाळीस वर्षांपासून कोरोना काळात आपली आई मृत्यूच्या दारात असताना वारी बंद पडू दिली नाही वारीत निघताना अनेक संकट आली संकटांना सामोरे जाऊन वारी अखंडपणे चालू ठेवणारा हा भडणयाचा पांडुरंग शरीरात शक्ती व ऊर्जा आहे तोपर्यंत विठ्ठलाची वारी बंद पडू देणार नाही भक्तांना विठ्ठलाचे दर्शन घडवून आणणारा भडण्याचा पांडुरंग एवढे मात्र निश्चित
शरीरात जोपर्यंत शक्ती व ऊर्जा आहे तोपर्यंत पांडुरंग विठ्ठलाचे वारी चालू ठेउ विठ्ठलाचे दर्शन घेत नाही तोपर्यंत मनाला समाधान वाटत नाही आषाढी वारीला विठ्ठलाचे दर्शन घेऊनच माघारी घरी परतो
ह भ प पांडुरंग पुना माळी
शिंदखेडा वारकरी साहित्य परिषद तालुका अध्यक्ष