महाराष्ट्रात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या ; राहुल गांधींनी सरकारवर साधला निशाणा, म्हणाले..

0

मुंबई । राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचे चित्र आहे. कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशामध्ये प्रगतशील अशा महाराष्ट्रामध्ये बळीराजाला मात्र आपला जीव गमवावा लागतो आहे. मागील तीन महिन्यांमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरुन आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी समोर आली आहे. केवळ तीन महिन्यामध्ये तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

याबाबत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, कल्पना करा… फक्त तीन महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही फक्त एक आकडेवारी आहे का? नाही. ही ७६७ उद्ध्वस्त घरे आहेत. ७६७ कुटुंबे जी कधीही सावरणार नाहीत. आणि सरकार? ते गप्प आहे. ती उदासीनतेने पाहत आहे, अशा शब्दांत राहुल गांधींनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था मांडली आहे.

पुढे त्यांनी लिहिले आहे की, शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत चालला आहे – बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे… पण किमान आधारभूत किमतीची हमी नाही. जेव्हा ते कर्जमाफीची मागणी करतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ज्यांच्याकडे करोडो आहेत? मोदी सरकार त्यांचे कर्ज सहजपणे माफ करते. आजच्या बातम्या पहा – अनिल अंबानींचा ₹४८,००० कोटींचा एसबीआय “फसवणूक”. मोदीजींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे म्हटले होते पण आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांचे आयुष्य निम्मे होत चालले आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना मारत आहे – शांतपणे, पण सतत आणि मोदीजी स्वतःच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत, अशा गंभीर शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.