मुलीची विक्री, लग्न लावलं, गर्भपात केला; लेकीच्या नरकयातना कळताच वडिलांनीही संपवलं

0

जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात  एका अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने तिची विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तिचं कोल्हापुरात एका व्यक्तीसोबत लग्न लावून तिचं लैंगिक शोषण केलं आहे. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपींनी तिचा गर्भपात देखील केला आहे. हा सगळा प्रकार पीडितेच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली आहे.

भैया रामदास पाटील (वय ४१) असं आत्महत्या केलेल्या पित्याचं नाव आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या अल्पवयीन मुलीला कामाच्या बहाण्याने फसवून नेऊन विकले गेले आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावले. या धक्क्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील काही महिलांनी पीडित मुलीला नोकरीच्या बहाण्याने नाशिकला घेऊन गेले होते. मात्र, तिला कोल्हापूर येथे एका व्यक्तीला दोन लाख रुपयांत विकले. एवढंच नव्हे तर आरोपी महिलांनी तिचं बळजबरीने लग्न लावून दिलं. जानेवारी 2025 मध्ये कोल्हापूर इथं लग्न झाल्यानंतर मे महिन्यात तिचा गर्भपातही करण्यात आला, अशी माहिती मुलीने स्वतः घरी परत आल्यावर दिली.

मुलीवरील अत्याचाराचा वडिलांना मानसिक धक्का
ही माहिती ऐकून वडील भैय्या पाटील यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतर संबंधित महिला आणि कोल्हापुरातील व्यक्तींकडून पाटील कुटुंबीयांवर सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या. “मुलगी विकत घेतली आहे, पैसे आणि दागिने परत द्या, नाहीतर मुलगी परत पाठवा” असा दबाव आरोपींकडून टाकला जात होता. यामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या भैय्या पाटील यांनी रविवारी आत्महत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.