‘के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’तर्फे ‘वर्किंग एक्झिक्युटिव्ह्जसाठी एमबीए’ अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीस प्रारंभ

0

भारतासाठी भविष्यकालीन नेतृत्व घडवण्याचा संकल्प

मध्यम कारकीर्दीत असलेल्या व्यावसायिकांसाठी खास तयार केलेला, भविष्यानुगामी दृष्टिकोन असलेला ‘केजेएसआयएम’चा एमबीए अभ्यासक्रम हा सैद्धांतिक ज्ञानासोबत प्रत्यक्ष व्यावसायिक कौशल्यांचा समन्वय साधणारा.

पुणे : कामकाज करणाऱ्या व्यावसायिकांसाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘वर्किंग एक्झिक्युटिव्ह्जसाठी एमबीए’ या प्रमुख अभ्यासक्रमाच्या सहाव्या तुकडीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा सोमय्या विद्याविहार विद्यापीठाअंतर्गत कार्यरत असलेल्या के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (केजेएसआयएम) या अग्रगण्य बी-स्कूलने केली आहे. १५ महिन्यांचा हा ऑनलाइन अभ्यासक्रम मध्यम कारकीर्द गाठलेल्या व्यावसायिकांना प्रगत व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्ये मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. आजच्या सतत बदलत्या आणि स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्ये अत्यावश्यक आहेत.

बीएफएसआय (बँकिंग, फायनान्स व विमा), आरोग्यसेवा, उत्पादन, विक्री व विपणन, आयटी / आयटीईएस अशा विविध क्षेत्रांत ३ ते १५ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या व्यावसायिकांकडून या अभ्यासक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतभरातील विविध भौगोलिक पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी दाखल झाले आहेत. हा अभ्यासक्रम सैद्धांतिक समज आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा समन्वय साधणारा एकात्मिक शिक्षण अनुभव देतो. यात शिकणाऱ्यांना धोरणात्मक आणि विश्लेषणात्मक विचारक्षमता विकसित करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच विवाद निवारण, कार्यसंघ व्यवस्थापन आणि सहानुभूतीपूर्ण संवाद यांसारखी प्रगत नेतृत्व कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना परिवर्तनाचे नेतृत्व करण्यासाठी, व्यवसायिक पुनर्रचना घडवून आणण्यासाठी आणि डेटा-आधारित निर्णय घेण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे हा या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू आहे. तंत्रज्ञान-आधारित आणि अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत चाललेल्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर ही तयारी विशेषकरून उपयुक्त ठरते.

लवचिक, भविष्याभिमुख नेतृत्वासाठीची मागणी भारतातील कार्यशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, अशा वेळी या नव्या तुकडीचा प्रारंभ होत आहे. ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२४’नुसार, देशात रोजगारयोग्यता पातळी ५१.२५ टक्क्यांपर्यंत वाढली असली, तरीही व्यवस्थापन कौशल्य, निर्णयक्षमता आणि प्रभावी संवाद यांसारख्या महत्त्वाच्या क्षमतांमध्ये अजूनही लक्षणीय कमतरता जाणवते. मध्यम स्तरावरील व्यवस्थापनात कौशल्यांचा असमतोल असल्याची कबुली ६५ टक्क्यांहून अधिक भारतीय वरिष्ठ व्यवस्थापकांनी दिली आहे, असे २०२३च्या ‘मॅकिन्से ग्लोबल रिस्किलिंग’ सर्वेक्षणातही नमूद करण्यात आले आहे. उद्योगाभिमुख अध्यापन पद्धतीद्वारे कौशल्यांमधील ही तफावत भरून काढण्याचे उद्दिष्ट या ‘एक्झिक्युटिव्ह एमबीए’मध्ये बाळगण्यात येत आहे. म्हणूनच आर्थिक व्यवस्थापन, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, विपणन, धोरण आणि कार्यप्रणाली यांसारख्या आधुनिक व अत्यावश्यक विषयांत दर्जेदार शिक्षण देण्यावर हा अभ्यासक्रम भर देतो.

या अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती देताना ‘के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’चे संचालक आणि अधिष्ठाता डॉ. रमण रामचंद्रन म्हणाले, “वर्किंग एक्झिक्युटिव्ह्जसाठी एमबीए’ ही केवळ एक पदवी नसून, व्यावसायिकांना धोरणात्मक नेतृत्वाच्या दिशेने नेऊन परिवर्तन घडवणारी एक यात्रा आहे. तंत्रज्ञान, विश्लेषण व नेतृत्व या तीन स्तंभांवर आधारित हा अभ्यासक्रम असून, आजच्या वेगाने बदलणाऱ्या कॉर्पोरेट जगतात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना मजबूत आणि स्पर्धात्मक आधार तो देतो.”

‘टाइम्सप्रो’चे व्यवसायप्रमुख श्रीधर नागराजाचार म्हणाले, “जे एक्झिक्युटिव्ह्ज आपल्या धोरणात्मक दृष्टिकोनात आणि नेतृत्वकौशल्यात अधिक सखोलपणे प्रावीण्य मिळवू इच्छितात, त्यांच्यासाठी ‘केजेएसआयएम’चा एमबीए अभ्यासक्रम हे एक आगळेवेगळे व्यासपीठ आहे. ‘टाइम्सप्रो’मध्ये आम्ही उद्योगाशी सुसंगत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण देण्यास कटिबद्ध आहोत. हे शिक्षण ‘केजेएसआयएम’च्या कठोर शैक्षणिक निकषांशी पूर्णपणे सुसंगत आहे. आमच्या एकत्रित प्रयत्नांतून अशा प्रभावी शिक्षणप्रक्रिया घडवण्यात येत आहेत, ज्या केवळ आधुनिक कार्यस्थळाच्या बदलत्या गरजा पूर्ण करत नाहीत, तर व्यावसायिक प्रगती व नेतृत्वपर रूपांतरणही वेगाने घडवतात.”

हा अभ्यासक्रम ‘टाइम्सप्रो’च्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे सादर केला जात आहे. विद्यार्थ्यांना थेट ऑनलाईन वर्ग, केस-स्टडी आधारित चर्चा आणि प्रोजेक्ट-केंद्रित शिक्षण अशी लवचिकता या अभ्यासक्रमातून मिळते. हार्वर्ड केस स्टडीज, ब्लूमबर्ग लॅब सिम्युलेशन्स आणि कॅम्पसमधील सखोल अनुभव देणारा मॉड्यूल यांचाही त्यात समावेश असून, त्यामुळे एक समग्र आणि प्रभावी शिक्षणानुभव विद्यार्थ्यांना मिळतो. या विद्यार्थ्यांना ‘केजेएसआयएमचा विशेष माजी विद्यार्थी’ हा दर्जा मिळतो. त्यामुळे त्यांना व्यावसायिक नेटवर्क आणि दीर्घकालीन करिअरच्या संधी यांमध्ये सहज प्रवेश मिळू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.