ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्तकलागून – मंत्री झिरवळ

0

इगतपुरी :  

इगतपुरी तालुका हा आदिवासी व दुर्गम तालुका म्हणून प्रचलित आहे येथील निसर्गसंपदा व आदिवासी संस्कृती आज हि जोपसली जातं असून आता येथील आदिवासी तरुण शिक्षनाच्या प्रवहात येत असून उच्चपदावर काम करताना दिसत आहे. असाच आदर्श इगतपुरी तालुक्यातील खडकेद इंदूरे येथील आदिवासी कटुंबातील युवक व खेड गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य केरू दादा खतिले यांचा मुलगा याने वैद्यकीय क्षेत्रात नाव काढले आहे.

आदिवासी भागातील आश्रम शाळेत शिकलेला विद्यार्थी जिद्दीच्या जोरावर डॉक्टर होऊ शकतो हे खूपच प्रेरणादायी आहे. सर्व साधारण कुटुंबातून आलेला युवक एम बी बी एस होऊ शकतो हि अभिमानाची गोष्ट असून इगतपुरी सारख्या आदिवासी भागात गोरगरिबांच्या सेवेसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी केले. घोटी येथील सिद्धी विनायक हॉस्पिटलचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत नरहरी झिरवाळ बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर होते.

यावेळी सिद्धीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. संपत खतेले, डॉ. सुप्रिया सुपे खतेले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्धन मामा माळी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे घोटीचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, माजी आमदार शिवराम झोले, माजी सभापती रघुनाथ तोकडे, जिल्हा परिषद माजी सदस्य केरु दादा खतेले, भरत घाणे, युवानेते बाळासाहेब झोले, गटनेते विठ्ठल लंगडे, संपत काळे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, संचालक दिलीप चौधरी, वसंत भोसले, अण्णा पवार, सुनील वाजे, अनिल चौधरी, काशिनाथ कोरडे, युवानेते मदन कडू, नामदेव शिंदे, माजी सरपंच जनार्धन शेणे, शेतकरी मित्र अनिल वाजे, डॉ. श्रीराम लहामटे, हनुमंत बांगर, नामदेव भोसले, माजी उपसरपंच गौतम भोसले, विनायक काळे, रामदास गव्हाणे, निलेश काळे, अमोल जागळे, उत्तमराव शिंदे, स्वाती कडू, वैशाली गोसावी, सचिन तारगे, इगतपुरी तालुका मेडिकल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार कर्डक यांनी केले. सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या संचालिका सुप्रिया सुपे खतेले यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.