इराण-इस्त्रायल युद्धामुळे खाद्यतेलाच्या दराने घेतली उसळी

0

मुंबई । इराण-इस्रायल युद्धात आता अमेरिकेने उडी घेतल्याने संघर्षाची ही स्थिती बराच काळ अशीच राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातून खाद्यतेलाला मागणी वाढत आहे.कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या दराने उसळी घेतली आहे. सर्व प्रकारच्या तेलाचे दर किलोमागे तीन ते चार रुपयांनी तसेच पंधरा लिटर, किलोच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत.

युद्ध सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आयात शुल्क १० टक्क्याने कमी केले होते. त्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र, इराण-इस्रायल युद्धामुळे खनिजतेलाच्या किमती बॅरलमागे सहा डॉलर्सनी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकी, पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरांत वाढ झाली. जगभरातून मागणी वाढल्याने घाऊक बाजारात किलोमागे ३ ते ४ रुपयांनी वाढ झाली आहे.

खाद्यतेल पुरवठा साखळीवर परिणाम
सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (SEA) भूराजकीय तणाव, जागतिक अस्थिरता, खासकरून इराण-इस्त्रायल युद्धामुळे खाद्य तेलाच्या किंमतीचा भडका उडण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली होती. खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची भीती खरी ठरली. खाद्यतेलाचा पुरवठा करणारे जहाज अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांची गती मंदावली आहे. त्यातच इराणच्या संसदेने स्ट्रेट ऑफ होर्मूज जलमार्ग बंद करण्याचा ठराव मंजूर केला. अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होईल. मागणी आणि पुरवठा याचे गणित न जुळल्यास अनेक वस्तूंच्या किंमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. तर काहींच्या मते, रशिया, चीन, तुर्कीची मध्यस्थी हे युद्ध थांबवू शकते. इराण अणू ऊर्जा कार्यक्रमाविषयी माहिती देण्यास राजी होऊ शकतो. जगाला कोणतेही युद्ध परवडणारे नाही अशी सर्वच देशांची भूमिका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.