जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या..

0

जळगाव । मागच्या काही दिवसात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागत आहे. अशातच जळगाव सराफा बाजारात ग्राहकांना डबल लॉटरी लागली. कारण चांदीसह सोन्यात मोठी घसरण दिसून आली. अचानक भावात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांचा आनंद द्विगुणीत झाला.

जळगावच्या सराफ बाजारात सोने ६०० रुपये तर चांदीचे दर ४ हजार रुपयांनी घसरले. त्यामुळे ग्राहकांना अचानक लॉटरी लागली. आतापर्यंत दरवाढीने हैराण असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला.

सोन्याचे दर ९८ हजार ९०० रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचे दर १ लाख ०५ हजार रुपये किलोवर आले आहे. गेल्या काही दिवसातील ही मोठी घसरण मानण्यात येत आहे.गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीतील घसरणीचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी दिवसभरात गर्दी केली होती.

युद्धामुळे वाढलेल्या दरांना कुठलाही आधार नसल्याने दरात घसरण झाली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इस्त्रायल- इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे सोने चांदीच्या दरात वाढ झाली होते.

Leave A Reply

Your email address will not be published.