ग्राहकांना दिलासा; सोन्याच्या दरात प्रति तोळा ६०० रुपयांनी घट
जळगाव । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहे. एक तोळा सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त आहेत. चांदीने देखील ऐतिहासिक पातळी गाठली आहे. यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, २० जून खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळणार आहे. आज सोन्याच्या दरात कपात झाली आहे. सोन्याच्या दरात आज प्रति तोळा ६०० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याचे दरात घसरण झाली असली तरीही हे दर १ लाखांपेक्षा जास्त आहेत.
आजचे सोन्याचे दर
२४ कॅरेट सोन्याचे भाव
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,००,४८० रुपये आहे. या दरात ६०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८०,३८४ रुपये झाले आहेत. या दरात ४८० रुपयांनी घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर घसरल्याने आज सोने खरेदीसाठी उत्तम मूहूर्त असला तरीही चालेल. १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घट झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील घट होणार आहे. २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात प्रति तोळा ५५० रुपयांनी घट झाली आहे. हे दर ९२,१०० रुपये आहे. तर ८ ग्रॅमच्या किंमतीत ४४० रुपयांची घट झाली आहे. हे दर ७३,६८० रुपये झाले आहेत. १० तोळे सोन्याच्या किंमतीत ५००० रुपयांनी घट झाली आहे.
चांदीचा दर
आज चांदीच्याही दरात कपात झाली आहे.काल १ किलो चांदीचे दर १,१०,००० रुपये आहेत. या दरात २००० रुपयांनी घट झाली आहे. १०० गॅम चांदीची किंमत ११,००० रुपये आहे. १० ग्रॅम चांदीचे दर १,१०० रुपये आहेत.