मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न ; जळगावात खळबळ
जळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच ही व्यक्ती समोर आली आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना जळगवाच्या आकाशवाणी चौक परिसरात घडली. पोलिसांनी वेळीची रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळाल. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच या ताफ्यामध्ये घुसून एखा व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात ही घटना घडली. संजय वराडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. संजय यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला.
शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे या ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी संजय यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यामुळे शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.