भाजप आता पवित्र झाली; नाथाभाऊंचा सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावरून टोला

0

जळगाव । नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांच्या या भाजप प्रवेशाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर टीका केलीय. बडगुजर यांना प्रवेश देऊन भाजप आता पवित्र झाल्याचा टोला हाणला आहे.

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रवेश दिला. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. एकनाथ खडसे बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झाली आहे. नाथाभाऊंना भाजपमध्ये प्रवेश देत असताना त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. त्यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.

माझ्या प्रवेशामुळे भाजप त्यावेळी फार अपवित्र होत होती. पण आता या सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झाली आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. खडसे यांनी यावेळी भाजपच्या कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. फडणवीस व महाजन या दोघांनीच आपल्या भाजप प्रवेशाला विरोध केल्याचे खडसे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.