अवकाळी पावसाने 3 महिन्यात पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी चिंतातूर
जळगाव – जिल्ह्यामध्ये एप्रिल, मे, जून या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये 15410 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून 27 हजार 661 शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
जळगाव जिल्हा हा आपल्या उष्ण तापमानासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र 2025 या वर्षात एप्रिल-मे या जिल्ह्याच्या कडक उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर जून महिन्यातही तिच परिस्थिती कायम आहे. ज्या मे महिन्यात शेतकरी नांगरणी, वखरणी, नागटी ही सर्व कामे करून शेत मे महिन्यात ऊन खाण्यासाठी मोकळे सोडतो आणि जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची पेरणी करण्यास सुरुवात करतो. मात्र यावर्षी मे-जून महिन्यात पावसाने आपली हजेरी लावलेली आहे
एप्रिल महिन्यात दोन दिवस पाऊस पडल्याने 2338 हेक्टर वरील 4855 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. मे महिन्यात 7 वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे 9056 हेक्टर वरील १९३१८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर जून महिन्यात 4016 हेक्टर वरील 3488 शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे.
अवकाळी पावसामध्ये मका ज्वारी बाजरी भाजीपाला कांदा केळी फळपिक, मुग, तीळ या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. खरीप हंगामाची अजून कुठे चाहुल लागणार होती मात्र जून मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ही पेरणी काही काळ लांबलेली दिसणार आहे. याकडे पावसाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे करोड रुपयाचे नुकसान केले आहेत. काही ठिकाणी तर अजूनही विजेचे खांब कोलमडलेले आहेत. शहरात तसेच ग्रामीण भागामध्ये दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.