विदर्भ खानदेश चे नाव लौकिक करणारे मराठीचे निर्माता, निर्देशक वाघ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
हिंदी मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृति प्रीत्यर्थ कलावंतांना दिल्या जाणारा सन्मान व यांच्या स्मृती चिन्हाचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार, चित्रपट सृष्टीचे नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चे सर्वेसर्वा अर्थातच मुकेश जी कनेरी, यांच्या हस्ते रहेजा विहार मुंबई येथे काल झालेल्या माया ममता, फिल्म च्या कहाणी वरती चार तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर खानदेश चे निर्माता /निर्देशक/ गीतकार /आणि उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता विशाल वाघ यांना देण्यात आला.
मुकेश जी कनेरी यांच्या हस्ते आज पर्यंत बॉलीवूडच्या खूप मोठ मोठ्यांची वर्णी लागलेली असून, खानदेश च्या मातीत पडलेल्या हिऱ्यांना घेऊन एक सामान्य माणूस चित्रपट बनवतो त्या चित्रपटा साठी ची धडपड बघून, दिग्दर्शक मुकेशजी कनेरी आणि त्यांच्या मॅनेजमेंट ने ह्या चित्रपटाची कहाणी आणि गाण्यांकडे लक्ष दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि धकाधकी च्या आजच्या काळात अशी हृदय द्रावक किंवा चित्त थरारक फिल्म बनत नाही आणि खऱ्या अर्थाने खानदेश मध्ये हिऱ्यांची खान असून त्या खाणीकडे चित्रपट सृष्टीचे किंवा शासनाचे दुर्लक्ष होऊ नये म्हणून राजकीय चौकटी च्या लोकांनी सुद्धा कलाकारां ना प्रोत्साहन दिले पाहिजे या उद्देशाने मुकेशजी कनेरी यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.


ह्या चित्रपटाचे उद्घाटन दोन वर्ष आधी आजचे केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे यांच्या हातून झाले असून जिल्ह्याचं नाव लौकिक करणाऱ्या कलावंतां साठी अशा लोकांनी पुढे आले पाहिजे अशा शब्दात निर्माता वाघ साहेब यांनी अपेक्षा व्यक्त केली. प्रेम आणि प्रेमातून घडणारे मनमोहक वातावरण, व्यसनाधीन लोकांच्या जीवनातील कायापालट आणि खरी माया ममता कुठे मिळेल याचा प्रत्यक्ष उदाहरण, तुफानी धुमधडाक्याने भरलेले गाणे, खानदेशच्या कलाकृतीतून साकार होत असणारा चित्रपट माया ममता हा लवकरच रुपेरी परद्यावर जनतेच्या आशीर्वादातून झळकणार आहे असे निर्माता विशाल वाघ यांनी जाहीर केले.