भुसावळहुन पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सचा अपघात ; सात ते आठ प्रवासी जखमी
जामनेर । जामनेर तालुक्यातल्या गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्स पलटी झाली झाल्याने अपघात झाला. यामध्ये सात ते आठ प्रवासी जखमींना तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
जखमी झाल्याची माहिती आहे.
गारखेडा गावाजवळ रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एकतर्फी वाहतूक सुरु असून रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये बेबाबाई घाडे (75), साहील घाडे (8, दोन्ही रा. खिरोदा), ललिता इंगळे (40), दिशा इंगळे (8, दोन्ही रा. बन्हाणपूर), योगेश चौधरी (34) आणि रणजित राजपूत (30, दोन्ही रा. भुसावळ) या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. प्रवीण पाटील व परिचारिकांनी जखमींवर उपचार केले. या बसमधील अन्य 15 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
बस उलटल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. ट्रॅफिक जाम झाले आणि गावातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले. काही जखमी प्रवाशांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर इतरांना जामनेर व जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.