कवी प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय राज्यश्री शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर

0

जळगाव : येथील कवी साहित्यिक तसेच सांस्कृतिक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांना सामाजिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय “राजश्री शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे.साहित्यिक कै प्रा.डाॅ.कुराडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 8 जून 2025 रविवार रोजी करवीर वाचन मंदिर हॉल भवानी मंडप कोल्हापूर येथील चौथे राज्य स्तरीय नक्षत्र कवी संमेलनात त्यांना मान्यवरांचे शुभ हस्ते देण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठा सेवा संघ तसेच कवी साहित्यिक यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.