फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशनची विजयी सलामी

0

जळगाव | मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या फुटबॉल संघाने सर्वाधिक गोल करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.

मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीगचा पहिला सामना बांद्रा नवेल डिसूजा ग्राऊंडवर झाला. संपूर्ण स्पर्धेत कॉर्पोरेट जगतातील १६ संघांनी सहभाग घेतला. ‘ए’ व ‘बी’ गृप मध्ये ही स्पर्धा होत आहे. यात जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचा फुटबॉल संघ पहिल्यांदा सहभागी झाला. जैन इरिगेशनचा पहिला सामना नेव्हल डॉकयार्ड सोबत ६ मे ला झाला. या सामनामध्ये जैन इरिगेशनने नेव्हल डॉकयार्ड ला नमवित ६-० ने सामना जिंकला. यामध्ये गोल फवाझ अहमद पहिला गोल १४ मिनिटे (पेनल्टी) केला तर त्यानंतर आकाश कांबळे १८ मिनिटे, अरशद शेख २९ मिनिटे, मो. मोईझ ४७ मिनिटे तसेच अभंग अजित जैन यांनी ६८ व ७० मिनिटांत असे दोन गोल केले. त्यांना निखिल माळी यांनी दोघं गोल असिस्ट केलेले आहे. धनंजय धनगर व मिशकात जमाल यांनी उत्कृष्ट कामगिरी या सामन्यात केली. संघ प्रशिक्षक म्हणून अब्दुल मोहसिन काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून अरबाज खान, सुरज सपके होते. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे अतुल जैन यांच्यासह अरविंद देशपांडे व सहकाऱ्यांनी कौतूक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.