जळगाव महापालिका निवडणूक नोव्हेंबरमध्येच शक्य ; इच्छुकांच्या आतापासून तयारी सुरु
न्यायालयाने येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.अर्थात मागील तीन- साडेतीन वर्षांपासून असलेले प्रशासकराज संपणार आहे. यात दीड वर्षांपासून प्रशासक असलेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रम देखील लागणार असून मात्र प्रत्यक्षात या निवडणूक ऑक्टोम्बर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र इच्छुकांच्या आतापासून तयारी सुरु होणार आहे.
जळगाव शहर महापालिकेवर मागील दीड वर्षांपासून प्रशासकराज कायम आहे. निवडणूक कधी होणार याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागणार आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने मनपासह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र मनपा निवडणुका या दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे.
दरम्यान जळगाव महापालिका निवडणूकीची प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महापौर आरक्षण सोडत, प्रभागनिहाय आरक्षण सोडत, प्रभाग रचना तसेच मतदार याद्यांच्या प्रक्रियेलाच तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. यानंतरच निवडणूक कार्यक्रम लागणार आहे.