भुसावळ मार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ । रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ विभागामधून जाणाऱ्या काही रेल्वे रद्द केल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याने आधीच बुकींग करून प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होणार आहे.
कोणत्या गाड्या रद्द?
गाडी क्रमांक ०१०२७ दादर-गोरखपूर विशेष २५ रोजी प्रस्थान स्थानकावरून तसेच ०१०२८ गोरखपूर दादर विशेष २४, २५ आणि २७ रोजी रद्द केली आहे. ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस – छपरा एक्स्प्रेस २५ रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द केली आहे. ११०६० छपरा लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २४ आणि २७ रोजी, तर १९०४५ सुरत – छपरा एक्स्प्रेस २४ आणि २६ रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द केली आहे. १९०४६ छपरा – सूरत एक्स्प्रेस २५, २६ आणि २८ रोजी, तर ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस २५, २६ आणि २७ रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द. तसेच, ०१०२५ दादर -बलिया विशेष २६ आणि २८ रोजी, तसेच २०९६१ उधना – बनारस एक्स्प्रेस २५ रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द केली आहे.
याचबरोबर २०९६२ बनारस – उधना एक्स्प्रेस २६ रोजी, ११०८१ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्स्प्रेस २६ रोजी, तर ११०८२ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २८ रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द केली आहे.