मंत्री धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराचे निदान

0

मुंबई : राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पडली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आराम घेत आहेत. असं असताना आता धनंजय मुंडे यांना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. त्यांना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना 2 मिनिटेही नीट बोलता येत नाही, असं ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

धनंजय मुंडेंचं ट्वीट काय?

माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ.टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही.

त्यामुळे, सध्या एक-दोन कॅबिनेट बैठका आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही, अशी माहिती मंत्री मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टममधून दिली. तसेच, याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल, असेही धनंजय मुंडेंनी आपल्या पोस्टमधून म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.