भांडुप पूर्वचे राष्ट्रवादीचे क्रियाशील शिलेदार नगरसेवक धनंजय पिसाळ यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

0

जन मानसात आपल्या गोड स्वभावाने प्रचलित असलेले सर्वांचे दादा म्हणजेच सामान्य लोकांच्या अहोरात्र कामात पडणारे, सदा हसतमुख जनहितार्थ लढणारे लाडके
मा. नगरसेवक म्हणून ख्याती मिळविलेले शरद पवार साहेबांचे लाडके नेतृत्व आदरणीय धनंजय दादा पिसाळ साहेब यांचा वाढदिवस जनसामान्यांच्या उत्साहातून संपन्न झाला. सर्वपक्षीय नेत्यांनी आणि मतदार संघातील जनतेने भरभरून आशीर्वाद रुपी शुभेच्छांनी प्रेमाचा वर्षाव केला .

विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने जनसामान्यां मध्ये हर्षाचे वातावरण तयार झाले होते. त्याला कारण त्यांनी केलेल्या विकास कामांचे ते फळ असुन, अशा व्यक्तिमत्त्वाचे ते धनी असून जनता अशा व्यक्तिमत्त्वाच्या माणसाची प्रतीक्षेने वाट पाहत आहे असेच चित्र दिसत होते. ह्या वेळेस मराठी चित्रपट महामंडळाचे निर्माता,दिग्दर्शक, लेखक, गीतकार वाघ साहेब सुद्धा हजर होते. शतायुषीच्या अपेक्षा व्यक्त करून,येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकी संदर्भात बोलताना, स्वभाव आणि प्रभाव दोन्हीही बलशाली असल्यामुळे मतदार संघाच्या आशीर्वाद त्यांना हमखास मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करून निर्माता विशाल वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले…

Leave A Reply

Your email address will not be published.