नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती

0

मुंबई: नुकतीच महायुती सरकारकडून राज्यातील जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. मात्र यातही काही ठिकाणच्या पालकमंत्री पदावरून नाराजीनाट्य समोर आली. यातच राज्य सरकारने दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती दिली आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे.

राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, एकाच दिवसात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

त्यामुळे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र स्थगिती दिल्यामुळे गिरीश महाजन यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.