वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे यांच्या उपस्थितीत सतीश सपकाळे यांच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन

0

सात नंबर वॉर्डाचे समाजसेवक सतीशभाऊ सपकाळे यांच्या 2025 च्या दिनदर्शिकेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना .संजयभाऊ सावकारे उपस्थित होते.दिनदर्शिकेच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार संजयभाऊ सावकारेंनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या वेळी त्यांनी सतीश सपकाळे यांच्या कार्यक्षमतेचे आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेचे विशेष कौतुक केले.

आमदार सावकारे म्हणाले, “सतीशभाऊ सपकाळे हे एक जबाबदार आणि कार्यतत्पर नगरसेवक आहेत. त्यांनी सात नंबर वॉर्डातील नागरिकांसाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे वॉर्डात सकारात्मक बदल दिसत आहेत.”

कार्यक्रमात सतीशभाऊ सपकाळे यांनी वॉर्डातील नागरिकांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वॉर्डातील महिला आणि पुरुष नागरिकांनी या क्षणाचा मनमोकळेपणाने आनंद घेतला. नागरिकांनी सतीशभाऊंच्या प्रामाणिक आणि प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले.

उद्घाटन समारंभानंतर सतीशभाऊ यांनी वॉर्डातील विकासकामे, नागरी समस्या आणि येणाऱ्या योजनांवर प्रकाश टाकला. त्यांच्या नेतृत्वामुळे सात नंबर वॉर्डात लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवल्या जात असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये दिसून आला.

कार्यक्रमाचा समारोप आनंददायी वातावरणात झाला आणि उपस्थितांनी सतीशभाऊ सपकाळे यांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.