जय गणेश जेष्ठ नागरिक संघ भुसावळच्या कार्यकारिणीची निवड; प्रा.डॉ. सौ. सुधा खराटे अध्यक्ष, दिलीप तिडके सचिव

0

भुसावळ । जय गणेश जेष्ठ नागरिक संघ भुसावळची कार्यकारिणी सभा जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत मागील वर्षभराचा कार्याचा आढावा घेतला आणि 2025-26 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड केली. या निवडीत संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. सौ. सुधा मधुकर खराटे यांची एकमताने निवड करण्यात आली, तर सचिवपदी श्री. दिलीप मधुकर तिडके यांची निवड झाली.

जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. राजेंद्र यावलकर यांनी या दोघांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि इतर कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष आदरणीय श्री. उमेश भाऊ नेमाड़े विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

मावळते अध्यक्ष श्री. राजेंद्र बावस्कर यांनी नूतन अध्यक्ष सौ. सुधा खराटे यांना शुभेच्छा दिल्या, आणि नूतन अध्यक्ष सौ. सुधा खराटे यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. आभार प्रदर्शन श्री. ज्ञानदेव इंगळे यांनी केले. नवीन कार्यकारिणीत 21 सदस्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नावे पुढीलप्रमाणे आहेत:

डॉ. ज्ञानदेव श्रीपतराव पाटील – संस्थापक अध्यक्ष
प्रा. डॉ. सौ. सुधा मधुकर खराटे – अध्यक्ष
श्री. नारायण जगदेव वडदकर – उपाध्यक्ष
श्री. संतोष नारायण महाजन – उपाध्यक्ष
श्री. दिलीप मधुकर तिडके – सचिव
श्रीमती विद्या भाईदास रामवंशी – सहसचिव
श्री. दगडू शंकर पाटील – कोषाध्यक्ष
श्री. पोपट पुरुषोत्तम पाटील – ऑडिटर
श्री. राजेंद्र रामदास बावस्कर – पदसिद्ध सदस्य
श्री शालीग्राम रामदास पांचपांडे – सदस्य
श्री. बाळू रूपचंद वानखेड़े – सदस्य
सौ. कुसुम वामन पाटील – सदस्य
सौ. मीना अनिल पाटील – सदस्य
श्री. शांताराम महादेव बोबडे – सल्लागार
श्री. दिनकर दत्तात्रय जावळे – सल्लागार
श्री. प्रकाश रामदास विसपुते – सल्लागार
सौ. जयश्री रामदास ढाके – सल्लागार
श्री. प्रकाश ओंकार तायडे – प्रसिद्धी प्रमुख
श्री. ज्ञानदेव उखर्डु इंगळे – प्रसिद्धी प्रमुख
श्रीमती पुष्पा प्रभाकर पाटील – विशेष निमंत्रित
सौ. भारती प्रकाश वारके – विशेष निमंत्रित
यावेळी नवीन कार्यकारिणीच्या निवडीचे औपचारिक अभिनंदन करण्यात आले आणि सर्वांनी आगामी कार्यात प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.