एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा बंडाचा इशारा, धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं

0

मुंबई । फडणवीस सरकारचा नागपूर इथे १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून मात्र मंत्रिपद न मिळाल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक नेते हे नाराज झाले आहेत. या नाराज व्यक्तींमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचाही समावेश आहे. आता तानाजी सावंत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. तानाजी सावंत यांनी आजाराचे कारण देत तडकाफडकी पुण्याला निघून गेले. त्यातच आता तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या बंडाचा इशारा दिला आहे.

धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं
तानाजी शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर मोठा बदल केला आहे. नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी काही तासांपूर्वी त्यांचे फेसबुक प्रोफाईल बदलले आहे. तसेच त्यांनी कव्हर इमेजही बदलली आहे. त्यात त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण हटवत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला आहे. त्यावर शिवसैनिक असे नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.