महायुती सरकारचा अवघ्या काही तासांवर शपथविधी; मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
नागपूर । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. नागपूरमध्ये दुपारी ४ वाजेला मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. शपथविधीसाठी फक्त काही तास उरले कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल याची उत्सुकता आमदारांमध्ये आहेत. अशातच शिवसेनेच्या 12 मंत्र्यांची नावं आता अंतिम झाली आहे. तर भाजपच्या आमदारांना आता फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेत कुणाला लॉटरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 12 आमदार शपथ घेतील. यामध्ये 6 नवीन चेहऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या 6 नवीन चेहऱ्यांना संधी
मराठवाडा छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट
रायगडमधून भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्रातून प्रकाश अबिटकर
कोकणातून योगेश कदम
विदर्भातून आशिष जैस्वाल
ठाण्यातून प्रताप सरनाईक
या पाच जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी
कोकणातून उदय सामंत
पश्चिम महाराष्ट्रातून शंभुराज देसाई
उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील
उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे
विदर्भातून संजय राठोड
या तिघांचा पत्ता कट
कोकणातून दीपक केसरकर
मराठवाडा धाराशिवमधून तानाजी सावंत
मराठवाडा छत्रपती संभाजीनगरचे अब्दुल सत्तार
भाजपच्या ‘या’ नेत्यांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
मंगलप्रभात लोढा
आशिष शेलार
अतुल भातखळकर
शिवेंद्रसिंहराजे भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रशेखर बावनकुळे
संजय कुटे
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
अतुल सावे
राष्ट्रवादीच्या या नेत्यांना लॉटरी
नव्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथवधी नागपूरात आज संध्याकाळी होत आहे. उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, आदिती तटकरे, अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.