जळगाव जिल्ह्यात संध्याकाळी ५ पर्यंत ५४.६९ टक्के मतदान
जळगाव । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या २८८ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान करता येईल. जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात संध्याकाळी ५ पर्यंत एकूण ५४.६९ टक्के मतदान झालं. शेवटच्या तासात अनेक ठिकाणी मतदारांच्या केंद्रावरती रांगा लागलेल्या दिसून येत आहे. मतदारांची उदासीनता चिंतेचा विषय झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६ लाख ५५ हजार ३४८ मतदार आज बुधवारी मतदानाचा हक्क बजावून १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे:-
१५ अमळनेर -55.10%
१२ भुसावळ -52.44%
१७ चाळीसगाव -56.05%
१० चोपडा -52.13%
१६ एरंडोल- 58.36%
१३ जळगाव सिटी- 45.11%
१४ जळगाव ग्रामीण -60.77%
१९ जामनेर -57.34%
२० मुक्ताईनगर- 59.69%
१८ पाचोरा -46.10%
११ रावेर – 62.50 %