दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्यासह चांदी भावात मोठी वाढ, वाचा आताचा १ तोळ्याचा भाव
जळगाव । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदी नवनवीन उच्चांक गाठत असून अशातच लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस अगोदरच सोन्यासह चांदीच्या किमतीने नवीन रेकॉर्ड केला आहे.
जळगाव सराफ बाजारात बुधवारी सोने दरात ८०० रुपयांची वाढ होऊन सोने भावाने ८० हजार रुपयांचा पल्ला गाठला. चांदीच्या भावातही एक हजाराची वाढ झाली असून यामुळे आता चांदी देकील प्रति किलो एक लाखावर पोहोचली. यामुळे दिवाळीसाठी सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.
ऑक्टोबर महिन्यात सोने-चांदीचे भात नवनवीन उच्चांक गाठत असन सध्या दिवाळी उत्सव काळातही ही वाढ सुरूच आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने भावात ४५० रुपयांची वाढ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा ८०० रुपयांची वाढ झाली. या वाढीने सोने भावाने प्रथमच ८० हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे
एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह ८२ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहे. दुसरीकडे धनत्रयोदशीला चांदी भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ झाली व ती ९८ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी पुन्हा एक हजार ३०० रुपयांची वाढ झाली. दोन दिवसात चांदी भावात दोन हजार ८०० रुपयांची वाढ होऊन ती ९९ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे