जळगावसह राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ चा तडाखा

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यात परतीच्या पावसाने उसंती घेतल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार असून नागरिकांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे. मात्र यातच हवामान विभागाने राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

सध्या जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३५ अंशांच्याही पुढे गेला आहे. तसेच पहाटेच्या धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे. सकाळपासून उकाडा वाढत असून, दुपारनंतर वळीव पावसाचे ढग दाटून येत आहे.

दरम्यान हवामान खात्याने आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. पुणे, सातारा, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.