एकनाथ खडसेंची मंत्री गिरीश महाजनांवर टीका

0

जळगाव । जामनेरमध्ये झालेल्या शिव स्वराज्य यात्रेत मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक दिलीप खोडपे यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलतांना एकनाथ खडसे यांनी भाजपच्या संकटमोचकावर म्हणजेच गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.

आगामी विधानसभा निवडणूक ही आरपारची निवडणूक आहे. त्यावेळेस गिरीश महाजन माझे पाय धरायचे आणि सांगायचं की मला वाचवा. मी सभा घेतली त्यामुळे त्यावेळेस ते निवडून आले होते. आता गिरीश महाजन यांना आणून मी पाप केलं असं मला वाटतं. ज्याला मोठे केले, ते सद्गृहस्थ वाटले होते, त्याची अलीकडची वर्तणूक पाहिली की पाप केले असे वाटते, असं एकनाथ खडसे यांनी टीका केली.

जामनेर मतदारसंघात मी काम केले आहे, आज सरकार कोणाचेही असले तरी त्याचे श्रेय आपले आहे. आज मंत्री असले तरी यांनी काय केले, असा सवाल खडसे यांनी गिरीश महाजन यांना या सभेत केला. आज गावात रस्ते नाही, मुतारी बंद, ग्रामविकास मंत्री तुम्ही तुमचे लक्ष कुठे? असे प्रश्नही त्यांनी गिरीश महाजन यांना विचारलेत.

यामुळे जळगावमध्ये पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा राजकीय वाद उफाळून आला असून मंत्री महाजन आणि खडसे यांच्या वादामुळे यंदाची विधानसभा चुरशीची ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.