माजी आमदार स्व. विठ्ठलराव घारे यांच्या सुनबाई अनिता घारे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
इगतपुरी :
इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तशा इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाल्याचे पाहावयास मिळत आहे. अशातच माजी आमदार स्व.विठ्ठलराव घारे यांच्या सूनबाई तथा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त अनिताताई घारे ह्या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब अजमवनार आहे. इगतपूरी त्र्यंबकेश्र्वर विधानसभा मतदार संघ हा आदिवासी राखीव असल्याने यावेळी स्थानिक आणि परके या मुद्यावर गाजणार आहे यात शंकाच नाही.
आपल्या मतदार संघाचा विकास करण्यासाठी स्थानिक इच्छुक असणाऱ्या अनेक उमेदवारांनी आपआपली ओळख करून प्रत्येक गावागावात जाऊन संवाद साधत आहे. स्व. माजी आमदार विठ्ठलराव घारे यांनी १९८० च्या दशकात दोन पंचवार्षिक विधानसभा सदस्य होते. ते काँगेस पक्षाचे निष्ठावंत असल्याने त्यांना काँगेस पक्षाचे तिकीट मिळत होते. त्या काळी भाताचा लढा खूप गाजला होता. विठ्ठल बाबा यांनी स्वतःचेच शेत जमीन गहाण ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली होती. साधे राहणी मान उच्च विचार सरणी असा वसा घेतलेल्या आदिवासी कुटुंबातील साधा माणूस म्हणून इगतपूरी तालुक्यांतील जनतेने निवडून दिले होते.
अनिताताई घारे ह्या स्व. माजी आमदार विठ्ठलराव घारे यांच्या सूनबाई तथा स्व. माजी सभापती रामदास घारे यांच्या सौभाग्यवती आहेत. अनिता घारे यांना २०१९ चा महाराष्ट्र शासनाचा आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली म्हणून आदिवासी विभागातर्फे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. श्रीमती आनिताताई घारे ह्या काळूस्ते गावच्या माजी सरपंच असुन आजही ग्रामपंचायत सदस्य आहेत. सासरे विठ्ठलराव घारे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या प्रमाणेच समाज सेवेचा वसा पुढे चालू ठेवण्यासाठी येत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती अनिता घारे यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांना दिली आहे.
या मतदार संघातील आदिवासी, कातकरी समाज आजही मूलभूत सुविधांपासुन वंचित आहे. साधे घरकुल त्यांना लवकर मिळत नाही, त्यांच्याकडे साधी शिधापत्रिका सुद्धा नसुन विकासापासुन कोसो दुर आहे. आदिवासी समाजा बरोबरच इतर समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच मतदार संघाचा विकास झाला पाहिजे यासाठी, बेरोजगारी दुर करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवुन देण्यासाठी, धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी व सासरे माजी आमदार विठ्ठलराव घारे यांच्या सारखा विकास करण्यासाठी मी ही विधानसभेची निवडणूक लडवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
माझे सासरे स्व. माजी आमदार विठ्ठलराव घारे हे दोन वेळा इगतपूरी तालुक्याचे आमदार होते. माझे पती सुद्धा इगतपुरी पंचायत समितीचे सभापती होते. माझ्या माहेरी माझे आजोबा अकोला संगमनेरचे पहिले आमदार होते. त्यामुळे मला राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले आहे. त्यांचा वारसा पुढे समाजसेवा करून चालूच ठेवण्यासाठी जनता जनार्दन यांनी माझ्या पाठीशी उभे राहून मला आशीर्वाद द्यावा हीच विनंती
— अनिताताई घारे , इच्छुक उमेदवार
मी एक सामान्य मतदार म्हणून स्व. माजी आमदार विठ्ठलराव घारे यांना जवळून अनुभवले आहे. घारे हे इगतपूरी तालुक्यांतील प्रत्येक गावागावात पायी जाऊन संवाद साधत होते. सर्व समाज बांधवांना सोबत घेऊनच त्यांनी काम केले होते. साधी राहणी उच्च विचारसरणी असलेला आमदार म्हणुन स्व. विठ्ठलराव घारे यांची ओळख होती. त्यांचेच कार्य पुढे अनिता घारे यांनी चालू ठेवले असुन त्यांना एकदा संधी देऊन विधान सभेवर पाठविले पाहिजे.
— मोहनराव भोईर (सामाजिक कार्यकर्ते )