आलाय श्री गणेशाची रेकॉर्डिंग मुंबईत संपन्न
निर्माता विलास पाटील जळगाव आणि गीतकार दिग्दर्शक विशाल वाघ ह्यांच्या लेखणीतून संगीतकार अशोक दादा वायंगणकर मुंबई ह्यांच्या बेजोड संगीत साथित स्टुडिओ फोनिक्स ला रेकॉर्डिंग संपन्न झाली. ह्यात खान्देश वासी आणि मराठी अस्मिता ह्या नात्याने बरेच कलावंत वर्षभर संगीत क्षेत्रात योगदान देतच असतात.
त्यात आदरणीय मराठी चित्रपट सृष्टी चे संगीतकार अशोक दादा वायंगणकर ह्यांच्या मार्फत खास गणेश उत्सवा निमित्त दोन गाण्यांची मेजवानी गीत रसिकांना मिळणार आहे. ह्यात एक युगल प्रेम गीत सुद्धा प्रसारित होत आहे. गायक मंगेश शिर्के, गायक शशिकांत मुंबरे,(प्रेम गीत ) गायिका संचिता मोरजकर आणि कोरस गायिका सुषमा मोरे, गायिका स्मिता पाटील गायक वीरेंद्र मोहिते सह विजय कर्जावकर महत्वाचे म्हणजे फोनिक्स स्टुडिओ चे रेकॉर्डिंग सर्वे सर्वा प्रतीक वाघ साहेब ह्या सर्वांनी अनमोल योगदान दिले असून श्री गणेशा च्या आशिर्वादा ने लवकरच रसिकांच्या सेवेत प्रदर्शित होत आहे