राजुराच्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपाई लाच घेताना जाळ्यात
मुक्ताईनगर । आईच्या नावे असलेल्या मालमत्तेवर ग्रामपंचायत दप्तरी मुलाचे नाव लावण्यासाठी सहा हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत शिपाई दोघे जळगाव लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले. दोघांवर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील तक्रार याने आईच्या नावे असलेल्या मालमत्तेवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके व आणि शिपाई सचिन अशोक भोलाणकर यांनी तक्रारदारास ११ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. राजुरा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक घोडके आणि शिपाई सभोलाणकर यांनी तक्रारदाराकडून ठरलेल्या ११ हजारांपैकी सहा हजारांची लाच स्वीकारली. त्याच वेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालून लाच स्वीकारलेली सहा हजारांची रक्कम हस्तगत करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
घोडकेचा राजुऱ्यात दहा वर्षांपासून मुक्काम !
नियुक्ती झाली तेव्हापासून सतत दहा वर्षे मनोज घोडके याने राजुरा ग्रामसेवक म्हणून मुक्काम ठोकला होता. सोबतच आजूबाजूच्या गावांचा अतिरिक्त कारभार सुद्धा त्याच्याकडे सोपविण्यात आला होता. त्याच्या विरोधात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी