जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; कंबरेला देशी कट्टा खोचून दहशत माजवणाऱ्या तरुण जेरबंद!
यावल / जळगाव : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. याचाच एक भाग म्हणून, यावल ते चोपडा महामार्गावर किनगाव शिवारात हॉटेल ‘श्री’ समोर पोलिसांनी अत्यंत फिल्मी स्टाईलने सापळा रचून, कंबरेला देशी कट्टा खोचून परिसरात दहशत पसरवण्याच्या तयारीत असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पवन कैलास सोनवणे (वय २५, रा. किनगाव बुद्रुक, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.


अशी झाली कारवाई: गुप्त माहिती अन् अचूक सापळा
जिल्ह्यात सण-उत्सवांच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांचे पथक यावल परिसरात गस्त घाजत होते.
यावेळी पवन सोनवणे हा तरुण बेकायदेशीररित्या देशी पिस्तूल बाўगून यावल-च चोपडा महामार्गावर फिरत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी आणि यावल पोलिसांचे पथक ताتत्काळ सतर्क झाले. पोउनि मैनुद्दीन सय्यद आणि पोकॉ हितेश बागुल यांच्यासह पथकाने किनगाव शिवारातील हॉटेल ‘श्री’ समोर अत्यंत वेगाने सापळा रचून दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पवनला जेरबंद केले.
जिवंत काडतुसांसह कट्टा जप्त
पोलिसांनी संशयित पवनची झडती घेतली असता, त्याच्या कंबरेला लोखंडी देशी बनावटीचा कट्टा (पिस्तूल) खोचलेला आढळला, तर पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतुसे देखील मिळून आली. पोलिसांनी शस्त्र आणि काडतुसे जागेवरच जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हा देशी कट्टा नेमका कुठून आणला आणि तो कोणावर दहशत माजवण्यासाठी किंवा कोणत्या गुन्ह्यासाठी बाळगला होता, याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करत आहेत. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.